गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या

664

– मालेवाडा येथील घटना, कुटुंबावर शोककळा
The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील मालेवाडा येथील विवाहित इसमाने शेतशिवरत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १३ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्वर नामदेव पोईनकर (३२) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, ज्ञानेश्वर पोईनकर हा सकाळच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत वीटभट्टीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दिसला. याची माहिती गावकऱ्यांना सांगितली असता एकच गर्दी जमलेली होती. दरम्यान घटनेची माहिती चिमूर पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर च्या मृत्यूने पोईनकर कुटुंबावर शोककळा पसरली असून सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here