गोंडवाना विद्यापीठात गौणवनउपज प्रकल्पांतर्गत ग्रामसभा प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

396

The गडविश्व
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ.नरेश मडावी , नियाज मुलानी आदी उपस्थित होते.
ग्रामसभा समृद्धकरण्यासाठी आणि बळकटीकरणासाठी ज्ञान ग्रहण करून पारंपारिक व्यवसाय कसा पुढे नेता येईल . ग्रामसभेतील लोकांना प्रशिक्षित करून त्यांनी इतर ग्रामसभांना प्रशिक्षण द्यायचे आहे. संपूर्ण भारताला आपण हे दाखवून देऊ गौणवनउपज प्रकल्पातून आपण स्वतःचा आर्थिक स्तर कसा वाढवू शकतो असा विश्वास डॉ. श्रीराम कावळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, संकलन, साठवणूक, विक्री यात कसे प्राविण्य प्राप्त करता येईल ?पेसा कायदा म्हणजे काय आहे? जैवविविधता काय आहे? मनरेगा काय आहे ? या सगळ्या गोष्टी अवगत झाल्या तरच ग्रामसभा समृद्ध होईल.
याप्रसंगी माहिती पुस्तकेचे वितरण ग्रामसभा सदस्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सतीश गोगुलवार यांनी तर आभार आणि संचालन डॉ. नरेश मडावी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here