ग्रामीण भागातील ३७ रुग्णांवर उपचार

286

The गडविश्व
गडचिरोली : दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केल्या जाते. या माध्यमातून किष्टापूर व नवेगाव माल येथील एकूण ३७ रुग्णांना उपचाराचा लाभ देण्यात आला.
अहेरी तालुक्यातील किष्टापुर येथे आयोजित व्यसन उपचार शिबिरात एकूण १६ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. दरम्यान संयोजिका पूजा येलूरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेत धोक्याचे घटक समजावून सांगितले. समुपदेशक साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी तालुका प्रेरक आंनद कुम्मरी, पोलिस पाटील महेश अर्का, सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम,मुख्याध्यापक एस.पी. दोन्तुलवार, अंगणवाडी सेविका संगीता मडावी, आशा वर्कर माया आत्राम यांच्यासह गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्यं केले.
चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण २१ रुग्णांनी उपचार घेतला. या शिबिराचे नियोजन तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम यांनी केले. अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णाची केस हिष्ट्री घेतली. यावेळी सरपंच सुप्रिया धुडसे, पोलिस पाटील कविता रामटेके, मुख्याध्यापक एल.बी. बोबाटे, आशा ठेमस्कर उपस्थित होते. दोन्ही शिबिराच्या माध्यमातून एकूण ३७ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here