– खासदार अशोक नेते यांना महिला कार्यकर्त्यांनी बांधली राखी
The गडविश्व
चिमूर, २५ ऑगस्ट : चिमूर येथे महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी उपस्थिती दर्शविली असता भाजप महिला कार्यकर्त्यां, पदाधिकारी व इतर महिलांनी राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी खा.अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया, ज्येष्ठ नेते वसंतभाऊ वारजुरकर, राजूभाऊ झाडे, डॉ.हटवादजी, प्रकाशजी वाकडे, घनश्यामजी डुकरे, राजूभाऊ देवतळे, मायाताई नन्नावरे, ममताताई डुकरे, गीताताई लिंगावत, वर्षाताई शेंडे, रेखाताई कारेकर, कल्पनाताई बोरकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारोच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी खा.अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन केले व रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. .