The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील चिमूर -बाह्मणी-अडेगाव मार्गावर असलेल्या म्हसली फाट्यानजीक वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना काल ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सदर घाट म्हसली येथील वैभव शिरभये यांच्या मालकीची असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नेहमी प्रमाणे शिरभये गाय त्यांच्या शेतात चरत होती दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने गाईवर झडप घेऊन ठार केले. भरदिवसा वाघाने गाय ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. सध्या शेतीचे काम सुरु असल्याने सदर घटनेमुळे शेतीचे काम कसे करायचे असा प्रश्न उभा झाला आहे. गाय ठार झाल्याने गाय मालकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी व परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.