जंगली हत्तींचा कळप आता देसाईगंज तालुक्यात

2360

– वाघाच्या दहशतीसह आता हत्तीची दहशत
The गडविश्व
देसाईगंज (Desaiganj-Gadchiroli) २३ सप्टेंबर : छत्तीसगडमधून धानोरा मार्गे कुरखेडा तालुक्यात जंगली हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकूळ माजवला होता. आता हा कळप देसाईगंज वनविभागाच्या शंकरपूर वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक १०३ मध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देसाईगंज तालुक्यात आधीच वाघाची दशशत असतांना हत्ती च्या कळपाने प्रवेश केल्याने नवे संकट तालुका वासीयांसमोर उभे झाले आहे. सदर हत्तीचा कळप हा रावणवाडी, टोली, बोळधा गावालगत असलेल्या जंगल परिसरात असल्याची माहिती असून शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे. हत्ती बघण्याकरिता नागरिक परिसरात धाव घेत असून वनविभागाच्या सुचनाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे अशावेळी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा देखील प्रश उपस्थित होत आहे.

हत्तींच्या कळपावर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्र सहायक विजय कंकलवार तसेच वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे, राकेश आसलवार, आदी त्यांच्यावर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी जंगलामध्ये जाऊ नये, असे आवाहन आरएफओ धांडे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केल्यानंतर हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चीम बंगाल मधील हुल्ला नावाची ८ सदस्यांची टीम दाखल झाली आहे. हुल्ला टीम या हत्तींना गावापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र यात अपयश येतांना दिसत आहे. हत्तीच्या कळपाने तालुक्यात प्रवेश केल्याने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी जंगलामध्ये जाऊ नये, हत्ती बघण्याकरीता कळपानजीक जाऊ नये असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात येत आहे.

Elephants Gadchiroli Desaiganj Kurkheda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here