जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

277

– दोन वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
– प्रा.आरोग्य केंद्राच्या नविन ईमारती मधुन रुग्णांना उत्कूष्ट आरोग्य सेवा द्या : पालकमंत्री विजय वडेट्टीवार
The गडविश्व
सावली : तालुक्यातील जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधुन दोन तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. पण दोन वर्षांनंतर २९ मे २०२२२ ला लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त निघाला. ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेटीवार व चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नते, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधिर मुंनगटीवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गहोलत यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत उद्घाटनाची तारीख निश्चित करुन काल २९ मे २०२२ ला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी उद्घाटन म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी मानुसकीचा खरा धर्म हा सेवा आहे, रुग्णालयात आलेल्या रुग्णाला आपुलकीने आणी प्रेमाने वागनुक दिल्यास त्याची अर्धी बिमारी तेथेच नष्ट होते, वेदना घेवुन आलेला रुग्णावर सौजाण्याची फुंकर मारुन रुग्णाना उत्कूष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्न शिल राहावे असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यानी लोकार्पन सोहळा कार्यक्रमा प्रसंगी केले. यावेळी चंद्रपुर जि.प. माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनुरवार, प.स.सावली माजी सभापती विजय कोरेवार, नगराअध्यक्ष लताताई लाकडे, नितीन गोहणे कांग्रेस तालुका अध्यक्ष, सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, ठानेदार आशिष बोरकर ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत , जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुदरी, ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.थेरे , संवर्ग विकास अधिकारी श्रीमती सुनिताताई मरस्कोले , कांग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोबाडे, ग्रामीण रुग्णालय सावलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाघधरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव डॉ.देवगडे, प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील सर्व कर्मचारी, आशा वर्कर .व गावातील नागरिक उपस्थित होते.
यावळी प्राथमीक आरोग्य केद्राची नवीन ईमारत अतीशय सुंन्दर अशी बाधलकी आहे असे सागुन पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले जिबगांव येथील प्रा आरोग्य केंद्राचे लोकार्पन लवकर व्हावे अशी ईच्छा जिबगांव वासीय व परीसरातील जनतेची होती ती पन आता आपली ईच्छा पुर्ण झाली असुन प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारतीच्या परीसरात सौदर्यीकरण, स्टिट लाईट, एक्सरे मशिन, जनरेटर आदी मागण्या लवकरच पुर्ण केल्या जातील असे या प्रसंगी सागण्यात आले. त्यावळी सुत्रसंचालन ठिकरे यांनी केले तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.थेरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here