जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा चा दहावीचा निकाल ९८.३३ टक्के

423

– सूरज ताराचंद शेंडे हायस्कूल मधून प्रथम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यात जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा चा निकाल ९८.33 टक्के लागला असून ३१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून सूरज ताराचंद शेंडे याने ९०.४० % गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. प्रांजल मनोहर वाघाडे ८९.८०%( व्दितीय), कु. डिंपल शशिकांत कुंभारे ८९.४०%( तृतीय), कु.संजीवनी पुरणदास मडावी ८८%, कु.साक्षी नितेश कोतकोंडावार ८७.६०%, करीना मोहूर्ले ८६.२०%,आकाश जांभूळकर ८४%, गुण प्राप्त केले आहेत.
दहावी परीक्षेत मिळालेल्या घवघावित यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष खोबरे, समिती सदस्य, पालकवर्ग, गट शिक्षणधिकारी आरवेली यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे, गणित शिक्षक पी. व्हि. साळवे , कु. रजनी मडावी, पी.बी. तोटावार, एस.एम. रत्नागिरी, कोल्हटकर, बुरमंवार, हेमके, सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here