– जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाख २८ हजार रुपये केले मंजूर
THE गडविश्व
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती मुलचेरा अंतर्गत ग्रामपंचायत कोठारी अंतर्गत येणाऱ्या कोलपल्ली येथे ० ते ६ वयोगटातील चिमुकल्या बालगोपालाना शिक्षणाचे धडे गिरविता यावे या करीता अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले. मात्र ही इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने चिमुकल्या बाल गोपालांच्या जीवास धोका होण्याची शक्यता होती. या करिता अंगणवाडी इमारतीचे निरीक्षण करून सदर प्रस्ताव जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडे पाठवण्यात आले. दिलेल्या प्रस्तावाचे जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दखल घेऊन चिमुकल्या बाल गोपालांना नवीन इमारती मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या करीता जिल्हा वार्षिक योजनेतून ११ लाख २८ हजार रुपये मंजूर केले. सदर नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्या श्रीमती सुनीता कुसनाके, ग्रा.प.कोठारी सरपंचा रोहिणी कुसनाके, ग्रा.प.चुटुगुंटा च्या सरपंचा साधना मडावी, व्यकटेश धनोरकर, कोठारी ग्रा.प.सदस्या जीवनकला तलांडे, मुलचेरा च्या माजी नगरसेविका रोशनीताई कुसनाके, रविभाऊ झाडे, सुरेश कुसनाके,मारोती पेंदाम, सतीश पोरतेट, शंकर रामटेके,दिनेश मडावी, रामु तलांडे, दीपक कुसनाके तसेच राजपूर पँच येथील समस्त गावकरी नागरीक उपस्थित होते.