जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथे शाळेत नवीन वसतिगृहाचे उदघाटन

267

THE गडविश्व
अहेरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम स्थित अहेरी,राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनय अंतर्गत अहेरी येथील मॉडेल शाळा अहेरी येथे सुरू असुन इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांना व वर्ग ९ वी ते १२ वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेता येणार आहे.
आज सदर वसतिगृहाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सावित्रीबाईं फुले यांच्या जन्मदिनानिमित्ताने सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधींवत पूजा करणयात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, जि.प.सदस्य संजय चरडुके, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कोडापे,सलीम शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु.योगीता नैताम यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक रोहनकर, डी.वाय.ढवस मँडम, मेघा बंडावार बेडेकर व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here