जेष्ठ कार्यकर्ते सुभाष सावकार मारगोनवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम : आविस मध्ये केला जाहीर प्रवेश

361

– जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाल श्रीफळ देवून केला सत्कार

The गडविश्व
अहेरी : राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष सावकार मारगोनवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामरक करत आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दीपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदिवासी विद्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम माजी आमदार दीपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सुभाष सावकार मारगोनवार हे राष्ट्रवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या भाऊजी आहेत. त्यांच्या आवीस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलाच धक्का बसणार आहे.
जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार हे राजाराम येथे आले असता सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे , जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, राजाराम ग्रामपंचायतचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सुरक्षाताई आकदर, ग्रा, पं. सदस्य नारायण कंबगोनिवार, सपनाताई तलांडे, प्रिया पोरतेट, माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके, शंकूतला कुडमेथे, ग्रा, पं. सदस्य वंदना अलोणे, माजी सरपंच संजय पोरतेट, भगवान मडावी, रंगा आलाम, अरविंद परकीवार, सुरेश सोयाम, जयराम दुर्गे, पांडू गावडे, सुरेश पेंदाम, चांदुरसाही आलाम आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here