ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात जिप्सी उलटून अपघात : एकजण जागीच ठार

258

– सिंदेवाही-शिवणी- चिमूर मार्गावरील घटना

The गडविश्व
चिमूर, ५ ऑक्टोबर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या सिंदेवाही-शिवणी- चिमूर मार्गावरील शिरकाडा नजीक जिप्सी वाहन उलटून एकजण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना  ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
शिवणी येथे आठवडी बाजार असल्याने परिसरातील नागरिक बाजार करण्याकरिता जातात. दरम्यान सायंकाळच्या सुमारास परत जाण्याकरिता साधन नसल्याने खासगी वाहनाने नागरिकांना जावे लागते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लागूनच असल्याने नागरिकांमध्ये वन्यप्राण्याविषयी भीती आहे. त्यामुळे शिवणी बाजारातुन शिरकाळा येथील काही प्रवासी शिवणी येथून गावाकडे परत जाण्याकरिता मासळ (बूज) कडे जाणाऱ्या जिप्सी वाहनात बसले. दरम्यान शिरकाळा गावानजीकच जिप्सी वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाला. घटनेची माहिती गावकऱ्यांना माहिती होताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती पोलिसांना दिली. या अपघात जिप्सी मध्ये असलेले एकजण ठार तर चालकासह चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती असून जखमींना सिंदेवाही येथील रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. जिप्सी चालक हा मदनापूर ता. चिमूर येथील असल्याचे कळते. शिवणी-शिरकाळा मार्ग हा अरुंद आहे. सदर अपघात  जिप्सी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाले असल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे. बातमी लिहेस्तव मृतक व जखमींची नावे कळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here