The गडविश्व
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध लागू झाले आहेत. 10 वी आणि 12 वी वगळता सर्व वर्ग 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान 10 वी आणि 12 वी वगळता इतर सर्व वर्गांना 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी देखील परीक्षा पुढे ढकलल्या जातात का ? की वेळापत्रकानुसारच होणार याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.