– गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील मुरूमबोडी शेतशिवारात शोधमोहीम राबवून जवळपास ४ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या केली.
मुरूमबोडी येथे अवैध दारूविक्री केली जात असल्यामुळे सकाळ, संध्याकाळ मद्यपींची गर्दी दिसून येत होती. तसेच दारूविक्री बंद असलेल्या आंबेशिवणी, आंबेटोला, खुर्सा, गीलगाव, कळमटोला, धुंडेशिवणी, अमिर्झा, भिकारमौशी आदी गावातील काही मद्यपी दारू पिण्यासाठी जातात. या गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे नियोजन करून गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने मुरूमबोडी शेतशिवारात शोधमोहीम राबविली. दरम्यान चार ड्रम मोहफुलाचा सडवा मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर भेंडाळे व त्यांच्या पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.