– मुक्तिपथ गांवसंघटनेने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
The गडविश्व
गडचिरोली : गावातील मुजोर दारू विक्रेत्यावर कारवाई करून अवैध दारूविक्री तत्काळ बंद करावी या हेतूने आरमोरी तालुक्यातील पेटतुकूम, डोंगरगांव, अरसोडा, पाथरगोटा, सूर्यडोंगरी येथील मुक्तिपथ गांवसंघटना सदस्य यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक, अंकित गोयल यांना आज भेटून निवेदन दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून, गावातील दारूमुळे होणाऱ्या त्रासाच्या कहाण्या गावातून आलेल्या महिलांनी पोलीस अधीक्षकाना सांगितल्या. दारूमुळे पुरुषासह लहान मुले मोठ्या प्रमाणात दारू पिण्यास शिकले. गावात सतत भांडणाचे वातावरण असते.
पेटतुकूम:- गांव लोकसंख्या ६१२ आहे. गावात शीख समुदायाचे मुजोर १२ दारू विक्रेते आहेत. जे गावसंघटना महिलांना मारण्याची धमकी देतात. डोंगरगांव व अरसोडा :- या गावात पेटतुकूम प्रमाणेच स्थिती आहे. दारूविक्री सुरु आहे. दारूविक्रेते मुजोर आहे. पाथरगोटा:- मागील ३ वर्षापासून या गावात दारूबंद होती. एका व्यक्तीने दारूविक्री सुरु केली. आरमोरी पोलीस विभागाला दोन वेळा याबाबत तक्रार केली, मात्र कारवाई झाली नाही. यामुळे इतर दोन ते तीन व्यक्तीने दारूविक्री सुरु केली. विक्रेते मुजोर आहेत.सूर्यडोंगरी :- ग्रा.प. किटाडी अंतर्गत आकापूर व किटाडी या दोन गावात दारूविक्री बंद आहे. सूर्यडोंगरी किटाडी ग्रा.प.मध्ये येते, या गावात ४० दारूविक्रेते आहेत. मोहाची दारू काढणे व विक्री मोठ्या प्रमाणात आहे. याबाबतचे निवेदन १२/१०/२०२२ ला SDPO गडचिरोली यांना दिले. त्यापूर्वी आरमोरी पोलीस स्टेशनला दोन ते तीन वेळा निवेदन देण्यात आले होते. मात्र काहीही कारवाई झाली नाही, निराशाच पदरी पडली. यामुळे गावातून आलेल्या मुक्तिपथ गांवसंघटनेच्या या सदस्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन, विक्रेत्यावर कारवाई करून विक्री बंदी करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना या सात गावातून आलेले मुक्तिपथ गांवसंघटनेचे महिला व पुरुष प्रतिनिधी. मुक्तिपथ तालुका संघटिका नीलम हरीणखेडे, मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यावेळी उपस्थित होते.