-अतिदुर्गम जांबिया ग्रापंमध्ये बैठक
The गडविश्व
गडचिरोली : ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व कार्यालये व गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम करण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील जांबिया येथील मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीने घेतला आहे.
जांबिया ग्रापं कार्यालयात सरपंच राजू नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करून मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्रगठीत करण्यात आली. यावेळी राजू हिचामी, मंगेश नवडी, रैनु पुंगाटी, केशु वड्डे, चुकलू मट्टामी, सुरेश आतलामी, डूगा जोई आदी उपस्थित होते.
यावेळी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत समजावून सांगण्यात आले. समिती बैठकीचे संयोजन करीता मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार उपस्थित होते.