दिव्यांगांसाठी आता ‘हाक तुमची साद आमची’ नवोपक्रम

242

– तुलशी तालुका दिव्यांग संघटना गडचिरोलीचा अनोखा उपक्रम

The गडविश्व
गडचिरोली : दर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र काढण्यासाठी येतात, बऱ्याच लोकांना प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया माहिती नसते, कागदपत्राची माहिती नसते, अशा वेळी लोकांची तारांबळ उडू नये, लोक नाउमेद होऊन परत जावू नये याकरिता तुलशी तालुका दिव्यांग संघटना गडचिरोली ने प्रथम त्यांना मदत करणे आवश्यक आहे असा निर्णय घेऊन जिल्हा सामन्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पुढे विषय मांडून त्यांच्या परवानगीने दर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला सल्ला व मार्गदर्शन करण्याचे ‘हाक तुमची साद आमची’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांग व्यक्तीला सल्ला व मार्गदर्शन लाभणार आहे.
गडचिरोली तालुक्याचा ठिकाण हा जिल्ह्याचा ठिकाण असून बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या दिव्यांग व्यक्तीसाठी असणाऱ्या योजना कोणत्या ? दिव्यांग व्यक्तिंसाठी असणारे कायदे कोणते ? दिव्यांग व्यक्तीचे संबंधित कार्यालय कुठं – कुठं आहेत ? त्याच प्रमाणे योजना घेण्यासाठी कोणत्या –कोणत्या कागद पत्राची पूर्तता करावी लागते याविषयी बऱ्याच तळागाळातील दिव्यांग लोकांना याची पुरती माहिती नसल्यामुळे बरेच लोक यापासून वंचित राहतात. हे राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या पुढाकाराने एक अभियान राबविले जात आहे, अख्या विदर्भामध्ये एकमेव जिल्हा आहे कि, त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र देऊन अगदी तळागाळातील लोकांना शासनाच्या योजनापर्येंत पोहचण्यासाठी पात्र करीत आहेत. दिव्यांग व्यक्तीसाठी फार मोठी अभिमानास्पद बाब असून यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फार मोठा वाटा आहे. याच अभियानाला मदत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था कुरखेडा, या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विकलांग व्यक्तीचे अधिकार या विषयाचे काम 2001 चालत आहे, यामध्ये दिव्यांग व्यक्तींना शोधणे, त्याचे वैद्यकीय पुनर्वसन करणे, सामाजिक पुनर्वसन,आर्थिक पुनर्वसन करणे, शैक्षणिक पुनर्वसन करणे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व्यवसायला लावणे, त्यांना शासकीय योजनाची माहिती घेऊन योजनाचा लाभ घेण्यासाठी मदत करणे, त्यासाठी त्यांचा बनविणे म्हणून त्यांचे बचतगट, संघ, परिसर संघटना, तालुका संघटना, जिल्हा संघटना, आणि विदर्भ संघटना अशा रचनेनुसार या विषयाचे काम सुरु आहे, संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या 16 संघटना, 96 बचतगट, एक जिल्हा संघटना, एक विदर्भ संघटना अशी रचना आहे.
12 जुलै 2021 ला गडचिरोली तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीवर काम करण्यासाठी, त्यांच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आणि महिन्यातून एकदा बसून विचार विनिमय करण्यासाठी “तुलशी दिव्यांग संघटना तालुका गडचिरोली” ची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आता ‘हाक तुमची साद आमची’ हा अनोखा उपक्रम राबिविल्या जाणार आहे. यामुळे अनेक दिव्यांगव्यक्तीला सल्ला व मार्गदर्शन लाभणार आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here