“ हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसा सम वागणे” sss
हे सगळं समजावून देण्यासाठी मला कविवर्य आदरणीय.रंजल्या गंजल्याच्या सेवेत आयुष्य खर्ची घालणारे. कृष्ट रोगी सेवा समितीची स्थापना करून त्यांचे आनंदवन फुलविणारे बाबा आमटे यांच्या कवितेचा संदर्भ देऊन नात्यांमध्ये उभा झालेला दुरावा कसा मिटविता येईल याकडे लक्ष वेधून मला लेखण करावे वाटले म्हणून वाचकांच्या सेवेसाठी लेखण.
आपण अगदी तालासुरात आणि मन मोहून टाकणाऱ्या आवाजामध्ये प्रार्थना म्हणतो पण आपण कुठून कुठं चाललो. याची आठवण होणे फार गरजेचे आहे. मी ज्यांच्यामुळे आपण जगात प्रवेश केलं. ज्यांनी मला घडविण्यात अख्य आयुष्य घालविले त्यांनाच आपण एका अडगळीच्या रुममध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमान ठेवतो, आणि पंढरीच्या वारी करायला जातोय,
सासू सासरे माझे घरी कशी जाऊ मी पंढरी !!
सासरा तो विठ्ठल. सासू ती रुक्मिणी सन्मानाचे ते मानकरी !!
अवघी पंढरी नांदते माझ्या घरी !! कशी जाऊ मी पंढरी !!
आपण सजीव सृष्टीतील सर्वात बुद्धिवंत प्राणी म्हणून आपली ओळख आहे, समाजामध्ये वावरताना आपण समाजशील प्राणी म्हणून आपण आपली ओळख देतोय. आपल्याला समाजाशिवाय, नात्याशिवाय आणि कुटुंबाशिवाय आपलं जगणं व्यर्थ असतो, आपला कुटुंब म्हणजे आई वडील, भाऊ बहिण आजी आजोबा आणि संयुक्त कुटुंबामध्ये इतर काका वैगेरे असतात. पण सध्याच्या परिस्थितीकडे बघितला तर संयुक्त कुटुंब पद्धती विस्कळीत झालेली आहे. लोप पावली आहे. अपवादात्मक फक्त आपल्या इकडे 36 गडी कंवर समाज आहे . यांच्याकडून आपण आदर्श घेऊ शकतो. कि नातं कसं टिकवायचं. अजूनही त्यांच्यामध्ये 25 ते 30 लोकांचे कुटुंब एकत्रित गुणांगोविंदाने नांदत आहे, याला म्हणतात संयुक्त कुटुंब पद्धती. आपल्या रक्ताची आणि नात्याची आन-बान-शान,राखून अजूनही नाते टिकविण्यासाठी त्यांची रक्ताची पाळेमुळे घट्ट एकत्रित कुटुंबामध्ये रोवली आहेत. आपण त्यापुढे नतमस्तक होऊ या, नाते कसे टिकविता येईल याचे धडे गिरवू या.
आपला जन्मच होण्याआधी आईच्या बाबांच्या आकांक्षा इतक्या मोठ्या असतात कि त्यापुढे गगणं ठेंगणे असते, आईला नुकतीच चाहूलं लागते की मी गरोदर आहे, ती ही गोष्ट सासरच्या मंडळीपासून तर माहेरच्या मंडळीपर्येंत जेव्हा पोहचे तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नसतो, इतका आनंद ओसंडून वाहतो कि, लगेच नात्याची विभागणी होते, आहाहा! काय तो थाट. सासूसासरे मोठ्या तोऱ्यात अहो ऐकलंत का? आम्ही आजीआजोबा होणारं आहोत. पण हा आनंद जास्त दिवस टिकणारा नसतो. कारण आम्ही आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याइतपत विचाराने प्रगल्भ नाहीत, वैचारिक पात्रता इतकी संकुचित आहे की त्याचा माप अजूनही बाजारात उपलब्ध नाही, आपण शिक्षणाच्या जोरावर आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र – सूर्य -ग्रह – तारे दुर्बिणीच्या सहाय्याने अगदी जवळून पाहायला लागलो. पण शेजारच्या सोबत आणि आपल्याच रक्ताच्या लोकांसोबत कसं वागायचं कसं बोलायचं यांचे तंत्र अजूनही आपण बारकून निरकून बघितलं नाही. ही खंत अजूनही गावागावामध्ये नजरेस येतो आहे.
मी माझ्या कामाच्या अनुषंगाने नेहमी गावामध्ये जातो. तेव्हा बरेच लोक अपंग, विधवा, वृद्ध, एकल महिला, निराधार यांच्या सोबत प्रत्येक्ष भेटीगाठी होऊन मनमोकळे संवाद साधला जातो, तेव्हा बऱ्याच समस्या पुढे येतात, यांच्या समस्याचे काय निराकरण करावे, माझं मन मलाचं प्रश्न करतोय, “आम्हाला एकचं मुलगा आहे पण आम्ही म्हातारे वेगळ आहोत, सून पोरका वेगळा आहे, मी विधवा वेगळी राहते, अविवाहित नणद वहिनीला चालत नाही, माहेरी आलेली विधवा, घटस्फोटीत बहिण/नणद चालत नाही, थोडं आजार असलेली सासू, नणद चालत नाही, मग आपल्या भगिनीला कोण चालतोय? विधवा, सधवा, म्हातारे,वृद्ध, एकल महिला या महिलाच आहेत. मग यांचा तिरस्कार करणाऱ्या महिलाच आहेत. आमच्याच महिलांना हे चालत नाही. किती मोठा दुरावा महिलाच महिलांचा करतात, अजूनही समाजातील महिला सकारात्मक विचाराने प्रवास करताना दिसत नाही, स्वतः स्वतःमध्ये गुरफटलेल्या दिसतात, आपणच आपल्यातील दुराव्याचे निर्मिते आहोत,हे कळावे एवढीच मापक अपेक्षा.
शिक्षणाने माणसातील अभिमान वाढतो, आर्थिक प्रगती होते. शेणामातीच्या घरावरून स्टाईलीस घरे आली. चिखलाच्या रस्त्यावरून सिमेंट कांक्रीटची घरे आली पण आमचा चालन सुधारलं नाही, आमची दृष्टी सुधारली नाही, आमच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा झालेली नाही, यामुळे दुरावा अधिक वाढत चाललाय, या आधुनिकीकरणामध्ये स्टाईलीसच्या घरामध्ये आणि शहरातील वास्तव्यामध्ये म्हातारे सासूसासरे नको आहेत, हि मोठी खंत आणि दुरावा यातून प्रतीत होत आहे, आजच्या वास्तव्यामध्ये आईवडील मुलाच्या सह्वासासाठी तळमळत आहेत. आजी आजोबा नातवांच्या कौतुकाला पोरके झालेले आहे, हा दुरावा आहे नात्यांचा, कित्येक आईवडील शेवटच्या क्षणी मुलांचा क्षणिक सुख मिळण्यासाठी तळमळताना आणि तळफळताना दिसतात आम्ही महिलांनीच ही दरी उभारली आहे.
आम्हाला या नकोत आणि आम्हाला त्या नकोत, सौभाग्यवतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात विधवा नकोत, वाणवाटणी कार्यक्रमात कुमारिका नकोत, विधवा नकोत, का? धार्मिक काम कार्यामध्ये विधवा नकोत. विधवा कोण? तीही आमच्या सारखी महिला आहे, आमची सखी आहे, तिला धीर देण्याऐवजी तिचा खच्चीकरण आपणच करतो आहोत, याकडे लक्ष देऊन येणाऱ्या कार्यक्रमामध्ये कसा सहभागी करून घेता येईल याचा विचार करण्याच्या अनुषंगाने विचार अधोरेखित करावं वाटले.