देशातील आकांक्षीत जिल्ह्यांना मागास जिल्ह्याच्या यादीतुन बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे एकत्रित प्रयत्न महत्वाचे

393

– केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन
– नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत मांडवीय यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आरोग्य कार्डांचे वितरण
The गडविश्व
नंदुरबार : देशातील आकांक्षीत जिल्ह्यांना मागास यादीतुन बाहेर काढण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे एकत्रित प्रयत्न महत्वाचे आहेत. येत्या दोन वर्षात नंदुरबारला आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतुन बाहेर काढण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. मांडवीय यांच्या उपस्थितीत मध्ये नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली; त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय सध्या देशभरात आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातुन गरीब आणि गरजु रुग्णांना आयुष्मान भारत योजनेतुन पाच लाख रुपयापर्यंतचे औषधोपचार आणि शस्त्रक्रीया सारख्या सुविधा देण्याचे काम करत आहे. त्यामुळे अशा चांगल्या कामासाठी सर्वांनी पुढे येवुन गरजु आणि गरीब कुटुंबासाठी आरोग्याचे काम करण्याची गरज देखील मनसुख मांडवीया यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात मांडवीय यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, आमदार विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदीसह अधिकारी आणि सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार सारख्या आंकाक्षीत जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडुन उत्तम दर्जाचे काम सुरु असुन केंद्र शासन त्यांना त्याअनुषंगाने चांगल्या प्रकारे मदत करत असल्याचे मांडवीय यांनी सांगितले .
पल्या दोन दिवसीय दौर्याच्या पहिल्या दिवशी, आज, मांडवीय यांनी नवापुर येथील टेक्सटाईल पार्कला आणि जिल्हा सामांन्य रुग्णालयाला भेट दिली. नवापुर जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी ईपीआरसी ०२ वापरून बनवलेल्या आयसीयु युनिटची पाहणी केली. याच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शंभर खाटांची क्षमता असलेल्या नवीन महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे उदघाटन केले.मांडवीय यांनी त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा गावातील आयुष्यमान भारत उपकेंद्राला भेट दिली. आयुष्यमान भारत योजना जिल्हा सामान्य रुग्णालयातुन चांगल्या प्रकार कार्यन्वीत केल्या जात आहेत . यातुन गोरगरीब गरजु रुग्णांना पाच लाखांपर्यतचा औषधोपचार आणि शस्त्रक्रीया देखील उत्तमरित्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसचे नांदरखेडा आरोग्य उपकेंद्रात टेलीमेडीसीन सुविधेचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील पारंपारीक वनसंसाधनांवर होत असलेल्या प्रक्रियांची मांडवीय यांनी पाहणी केली. शिवाय शेतकऱयांसाठी चालविल्या जात असलेल्या विकास भारती कम्युनिटी रेडीओ केंद्रालाही त्यांनी भेट देवुन त्याची पाहणी करत कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले .
आकांक्षीत जिल्हा असलेल्या नंदुरबार ला भेट देण्याच भाग्य मला लाभलले असे सांगत, मांडवीय यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास सर्वांगीन पद्धतीने करण्यासाठी, जे जिल्हे विकासात्मक दृष्ट्या मागे आहे त्या जिल्ह्यात कृषी, आरोग्य, शिक्षण सुविधा चांगल्या दर्जात्मक आणि परवडणाऱया असाव्यात यासाठी आंकाक्षीत जिल्हा योजना राबविली जात असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here