चारचाकी वाहनांसह ४१ लाखांचा गांजा जप्त

636

– गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील कारवाई, १०३ किलो गांजा जप्त
The गडविश्व
चंद्रपूर : तेलंगणातुन गडचिरोली मार्गे चंद्रपूर येथे गांजाची तस्करी करतांना चीचपल्ली नजीक दोघांना अटक केल्याची कारवाई आज शनिवार 26 मार्च रोजी करण्यात आली. या प्रकरणी श्रीनिवास नरसय्या मचेडी (५०), शंकर बलय्या घंटा (२९) दोघेही राहणार मज्जीड वाडा, सुभानगर , मथनी, करीमनगर, तेलंगणा यांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी श्रीनिवास नरसय्या मचेडी (५०) जे शिक्षक असल्याचे कळते. यांच्याकडून १०३ किलो ८३९ ग्रॅम गांजासह तब्बल ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परराज्यातुन गडचिरोली मार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करून मूल- चंद्रपूर मार्गावरील चीचपल्ली नजीक पाळत ठेवली. दरम्यान एपी ९ बीई ११२२ क्रमांकाची होंडा सिटी कंपनिकचे चारचाकी बहिण व एपी १० एबी २७६९ क्रमांकाच्या दोन चारचाकी वाहनांना थांबवून वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांत एकूण ५१ पाॅकीटमध्ये १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१ लाख १५ हजार १७० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सर्व ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपितांविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (क) एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करून अटक केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, राजेंद्र खनके, रमेश तोकला, नितीन साळवे, प्रकाश बल्की, संजय आतकुलवार, सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, गणेश भोयर, मिलिंद जांभुळे, गणेश मोहुर्ले, सतीश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रवींद्र पंधरे, प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here