धक्कादायक : गडचिरोलीत नळाच्या पाईपलाईनमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

17323

– नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा रोष
The गडविश्व
गडचिरोली : शहरातून एक धक्कादायक तेवढीच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील चामोर्शी मार्गावरील सेलीब्रेशन हाल नजीक असलेल्या नळाच्या पाईप लाईन मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. योगेश शेषराव देवोजवार (३५) रा.विवेकानंद नगर, गडचिरोली से मृतकाचे नाव असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी मार्गावरील सेलीब्रेशन हॉल नजीक असलेल्या पाण्याच्या टाकीच्या वॉल मधून कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आज दुपारी २ वाजताच्या सुमारास काढण्यात आला. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मृतक योगेश हा मनोरूग्ण असल्याचे कळते. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याने चामोर्शी मार्गावरील पाण्याच्या टाकीमध्ये आत्महत्या केली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे. आज दुपारच्या सुमारास नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी मृतदेह पाणी सोडण्याच्या वॉल मधून काढला यावेळी बघ्यांची गर्दी जमलेली होती. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला.
सदर घटनेमुळे नागरिकांनी नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला असून दुषीत पाण्याचा पुरवठा केला जात होता का असा सवाल सुध्दा केला आहे. ? पाण्याच्या वॉल मध्ये मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिकांना पुरवठा केला जाणारा पाणी हा दूषित होता ? पाईप लाईन मध्ये मृतदेह कसा आला ? सदर पाईप लाईन मधून कोणत्या भागात पाणी पुरवठा होत होता? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here