धक्कादायक : आधी निर्घृणपणे हत्या, नंतर मृतदेहाचे केले तुकडे व ठेवले फ्रीजमध्ये

1629

-अंगावर शहारे येईल अशी धक्कादायक घटना
The गडविश्व
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर : अंगावर शहारे आणणारी धक्कादायक तेवढीच खळबळजनक घटना दिल्ली मध्ये घडली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. तो तेवढ्यावरचं थांबला नाही त्याने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब असे या आरोपीचे नाव आहे तर श्रद्धा असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकृत प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहे.
आफताब आणि श्रद्धा यांची भेट मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये झाली, दोघांमध्ये आधी मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी आपल्या प्रमाबद्दल कुटुंबीयांना माहिती दिली परंतु घरच्यांचा विरोध होत असल्यामुळे दोघेही दिल्लीला पळून गेले व दिल्लीमध्ये छतरपुर दोघे एकत्र राहत होते. दरम्यान श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची विचारपूस करत होते. परंतु अचानक श्रद्धाचा काही दिवसांपासून संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांना संशय आला व दिल्लीला पोहोचत तिचा शोध घेतला परंतु तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता सुरुवातीला पोलिसांना कोणतीची माहिती मिळाली नाही मात्र तपासाचे चक्र अधिक गतीने फिरवत तांत्रिक तपास सुरू केली असता आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतले व विचारपूस केली असता सुरुवातील आफताबने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच आफताबने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की दिल्लीत आल्यावर श्रद्धाने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता त्यावरून आमच्यामध्ये भांडणे होत होती. मे महिन्यात आमच्यामध्ये असेच भांडणे झाले त्यामुळे रागाच्या भरात तिचा खून केला व खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरिराचे ३५ तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले, अशी कबुली आफताबने दिली. श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर सुऱ्याने तिच्या शरिराचे ३५ तुकडे केले व हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने नवीन फ्रीज खरेदी केले होते. १८ दिवस त्याने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. रात्री २ वाजता तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुकडे गोळा करत होता आणि बाहेर जाऊन फेकून येत होता. पोलिसांनी आफताब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र सदर घटनेने खळबळ उडाली असून अंगावर शहारे येण्यासारखी ही घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here