धक्कादायक : राज्यात गेल्या २४ तासात ९ हजार कोरोना बाधितांची नोंद

309

– आज ६ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद

THE गडविश्व
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. राज्यात आज तब्बल ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ४७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज ६ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण ४६० ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.
मुंबईत आज ६ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात ६३१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here