The गडविश्व
येवला : कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात काल ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहेत. या लसीकरणाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनची (covaxin Vaccination) लस देण्याचे जाहीर झाले आहे. पण, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एका १६ वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी कोविडशिल्ड (covishield ) लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
येवला तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे. कालपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले असून शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ वर्षीय विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी चक्क कोविशील्ड लस देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून येवला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत.