The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, ६ ऑगस्ट : आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमअंतर्गत आज ६ ऑगस्ट २०२२ रोजी स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने “घर घर तिरंगा, हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती फेरी काढण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पुर्ण झाल्याबदल देशात धुमधडाक्यात आझादी का अमृत महोत्सव साजरा काण्यात येत आहे. याची माहिती घरा घरा पर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने भव्य तिरंगा रॅली तसेच वृक्ष दिंडी काढण्यात आली. या फेरीमध्ये इयत्ता ५ ते १२ वर्गाचे एकुण ५०४ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त पणे सहभाग घेतला. रॅली मध्ये महात्मा गांधी, राजगुरू, भगतसिंग,चंद्रशेखर आझाद, क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले, झाशीची राणी आणि भारतमाता यांची वेशभूषा परिधाण करून स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या शुर वीरांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “तुमची शान आमची शान तिरंगा आहे आमची शान”, घर घर तिरंगा, अशा अनेक घोषणा देत गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.मुख्याध्यापक पी. व्हीं. साळवे, प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष खोबरे होते. या कार्यक्रमात शिक्षक तोटावार, कोल्हटकर, बुरामवार, देवकाते, बादल, शिक्षिका रजनी मडावी, स्नेहा हेमके, रेखा कोरेवार, चेलमेलवार,जुनघरे, कोरेटीजी यांनी भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार हरित सेना प्रभारी एस.एम.रत्नागिरी यांनी मानले.