धानोरा- रांगी -आरमोरी- ब्रम्हपुरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास

283

– बस सुरु करण्याची पालकांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २६ सप्टेंबर : शाळा सुरु होवून तिन महीने होत आहेत परंतु शालेय विद्यार्थ्यांना मानव विकासची बस उपलब्ध न झाल्याने वाहना अभावी विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते तर कधी वाहनाने धोकादायक प्रवास करत शाळा गाठावे लागता आहे. खासगी वाहनाने प्रवास केल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड हि बसत आहे. मोहली येथील माँडेल स्कुल आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर ब्रह्मपुरी आगाराची आरमोरी -रांगी -धानोरा- मार्गावर नियमित बस सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
एस.टी .महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप काळापासून म्हणजे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून ब्रम्हपुरी आरमोरी-रांगी-धानोरा येणारी बस बंद करण्यात आली ती आजतागत सुरु झालेली नाही. तेव्हा पासुन इतक्या महिन्याचा कालखंड उलटूनही बस सुरु करण्यात न आल्याने आरमोरी- रांगी- ब्रह्मपुरी व धानोरा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. बंद असलेली बस किमान शाळा सुरु झाल्यानंतर बस सुरु होईल अशी अपेक्षा होती परंतु अडीच महीन्याचा कालावधी उलटुनही ब्रम्हपुरी आगाराची बस सुरुच न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता बस नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची गोची झालेली आहे. शाळेत जायचे कसे असा प्रश्न विद्यार्थी विचारीत आहेत.
ब्रम्हपुरी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करूनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्रास दुर्लक्ष होत आसल्याचे नागरीक म्हणतात मात्र कमालीचा मनस्ताप व त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ब्रह्मपुरी- धानोरा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता गेल्या अडीच महिन्यापासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सुरुच न झाल्याने लोकांना कमालीचा ञास सोसावा लागत आहे. हि बस ब्रह्मपुरी येथून सकाळी ८ : ३० वाजता सुटून रांगीला १०: ०० पर्यंत येवून मोहली ला १० :३० पोहचत होती . हि वेळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य आहे. याच मार्गाने नियमित दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती. या बसने मोहगाव, विहीरगाव कोरेगाव,वानरचुवा, रांगी, खेळी, कन्हाळगाव, महावाडा येथील विद्यार्थी याच बसने आपला प्रवास करीत होते. परंतु या रस्त्यावर कोणतेही वाहन चालत नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेला मुकावे लागत आहे. यामुळे आरमोरी ,ब्रह्मपुरी, वैरागड, रांगी ,धानोरा येथील नागरिक व्यापारी शेतकरी विद्यार्थी कर्मचारी रुग्ण आदींना धानोरा आरमोरी ब्रह्मपुरी तालुका मुख्यालय याठिकाणी जाण्याकरता अत्यंत सोयीचे झाले होते त्यामुळे सदर बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. नागरिक एसटी बसने प्रवास करीत होते, ब्रह्मपुरी-आरमोरी-वैरागड-रांगी-धानोरा हा राज्यमार्ग असून देखील या मार्गावर अनेक खेडे आहेत. राज्य मार्गाचे बांधकाम देखील पूर्ण झालेले आहे. सदर मार्गावर ब्रह्मपुरी-रांगी-धानोरा एसटी बस सुरू नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ब्रह्मपुरी- रांगी धानोरा- परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन त्वरित बससेवा पूर्ववत सुरू करा.अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here