नक्षल्यांनी घडवून आणला आयईडी स्फोट : १ जवान गंभीर जखमी

503

– पोलीस जवान राबवित होत होते नक्षलविरोधी अभियान
The गडविश्व
कांकेर : जिल्हयातून मोठी बातमी सामोर येत आहे. नक्षल्यांनी पोलीसांवर हमला करत आईडी ब्लास्ट घडवून आणला यात एसएसबीचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हयातील ताडोकी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोसरूंडा कॅम्प जवळ नक्षल्यांनी अभियान राबवित असलेल्या पोलीस जवानांवर हमला करत आईडी ब्लास्ट घडवून आणला. यात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्लास्ट नंतर काही काळ पोलीस नक्षल चकमक घडुन आली. या घटनेला पोलीस अधिक्षक शलभ सिन्हा यांनी दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here