नक्षल्यांनी भरदिवसा हायवा ट्रकची केली जाळपोळ

1203

– नक्षल सप्ताह दरम्यान घडवली घटना, ७ ते ८ नक्षली ग्रामीण वेशभूषेत असल्याची माहिती
The गडविश्व
बस्तर : नक्षल सप्ताह दरम्यान भरदिवसा हायवा ट्रकची जाळपोळ केल्याची घटना आज गुरुवारी बासागुडा -अवापल्ली मार्गावर नक्षल्यांनी घडवून आणली.
नक्षल्यांच्या वतीने काल २३ मार्च पासून छत्तीसगड मध्ये नक्षल सप्ताह राबविण्यात येत आहे. दरम्यान आज सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी नक्षल्यांनी भरदिवसा बासागुडा -अवापल्ली मार्गावर हायवा ट्रकची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तारेम परिसरात हायवा वाहनाद्वारे गिट्टीची वाहतूक करण्याचे काम सुरू होते. दरम्यान नक्षल्यांनी वाहनाला थांबवून चालकाला उतरवून डिझेल टाकी फोडून पेटवून दिले व जंगलात पसार झाले. ७ ते ८ ग्रामीण वेशभूषेतील नक्षली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर घटनेची महितो मिळताच आवपल्ली पोलीस ठाण्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले व परीसरात शोधमोहीम राबविली. नक्षल सप्ताह हा २३ मार्चपासून सुरू असून २९ मार्चपर्यंत चालणार असल्याचे कळते. काल २३ मार्च रोजी नक्षल्यांनी ओरछा ब्लॉकला नारायणपूर जिल्हा मुख्यालयाला जोडनारा रस्ता खोदून ठेवला व रस्त्याच्या मधोमध बॅनरही बांधले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here