– १ जेसीबी, २ हायवा आणि २ मिक्सर आगीच्या कक्षात
The गडविश्व
कांकेर : नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काडत छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रस्ते बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सामोर येत आहे. जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांमध्ये १ जेसीबी, २ हायवा आणि २ मिक्सर मशिनचा समावेश आहे. कांकेर जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २० किमी अंतरावर ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील मरापी ते काळमुचेपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामात महामार्गावरील वाहनातून वाळू व गिट्टीची वाहतूक केली जात होती. उसेलीतून वाहनांची ये-जा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी १० ते १२ नक्षली अचानक माळमारीजवळ पोहोचले आणि वाहने थांबवून चालकांना वाहनातून खाली उतरवून वाहनांच्या डिझेलच्या टाक्या फोडून त्या पेटवून दिल्या जंगलात पसार झाले. रात्री काही तासांनंतर या घटनेची माहिती कांकेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. कांकेरचे एसपी शलभ सिन्हा यांनी सांगितले की, घटनेनंतर परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.