पाच दिवसीय पशुधनावर आधारित शेळी पालन, कुक्कुट पालन, व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

287

– 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 कालावधीत प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असुन या संस्थेचा मुख्य उददेश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करुन जास्तीत जास्त लोकांना,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 (5 दिवस) कालावधाचे ऑफलाईन “शेळी पालन, कुक्कुट पालन, व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबडयांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपण व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्तव, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक/युवतींनी www.mced.co.in या वेबसाईट वर 25 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी के. व्ही. राठोड, प्रकल्प अधिकारी, मो.न. ९४०३०७८७७३, व सौ. वनश्री रामटेके, कार्यक्रम आयोजक, मो. न. ९७६६४९९५९९, यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here