१ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला विडिओ
The गडविश्व
गडचिरोली : अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदना यांचा ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट अक्षरशा सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर नाकेजन रील सुद्धा बनवत आहे. आता या गाण्याचा मराठी रिमेक सुद्धा आला आहे. विजय खंदारे याचे विनोदी व्हिडिओ अनेकांनी युट्युबवर पाहिले असतील. त्यानेच श्रीवल्ली या गाण्याचा मराठी रिमेक बनवला आहे. या मराठी रिमेक गाण्याला युट्युबवर १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुद्धा होत आहे. विशेष म्हणजे त्याने हे गाणं मोबाईवर चित्रीत केले आहे. त्याची आवड म्हणून त्याने हे गाण चित्रीत केले आहे.
विजय खंदारे याने स्वतः या गाण्याला आवाज दिला आहे. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांनी मिळून हा मराठी व्हर्जन तयार केला आहे. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या गाण्यात विजय खंदारेसोबत तृप्ती खंदारे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तिने या गाण्यात श्रीवल्ली ची भूमिका साकारली आहे. त्याच्या या मराठी रिमेकला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामुळे तो स्टार झाला आहे.