पोलीस-नक्षल चकमक : सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट शहिद तर एक जवान जखमी

818

– पुतकेल जंगल परिसरात उडाली भीषण चकमक
The गडविश्व
बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पुतकेल जंगल परिसरात आज शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिस – नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सीआरपीएफचा असिस्टंट कमांडंट शहीद झाले आहे. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी जवानाला उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार , पुतकेल जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज शनिवारी सकाळच्या सुमारास सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवत जंगल परिसरात शोधमोहीम करत होते दरम्यान जंगलात आधीच घात लावून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनीहि प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला यावेळी काही काळ भीषण चकमक उडाली . या चकमकीत सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट एसबी तिर्की शाहिद झाले आहे. तर एक जवानही जखमी झाले आहे. या घटनास्थळी इतर जवान दाखल झाले असून शोधमोहीम सुरुच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here