प्रसिद्ध संगीतकार प्रफुल्ल कार यांचे निधन

443

The गडविश्व
मुंबई : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित संगीतकार प्रफुल्ल कार यांचे काल रविवारी राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
ट्विट करत ते म्हणाले, ‘प्रफुल्ल कार यांच्या निधनाने प्रचंड दुःख झाले. ओडिया संस्कृती आणि संगीतात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. सर्जनशीलता त्यांच्या कामातून दिसून यायची . त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.’
प्रफुल्ल कार यांनी ७० हून अधिक ओडिया सिनेमांना संगीत दिले. अनेक सिनेमे, अल्बम आणि रेडिओ कार्यक्रमांना आपला आवाज दिला. ‘कमला देश राजकुमार’ या गाण्याने ते घरोघरी प्रसिद्ध झाले.
प्रफुल्ल कार एक उत्तम संगीतकार, लेखक आणि स्तंभलेखक होते. कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here