प्रा. रश्मी शंकरराव डोके आचार्य पदवीने सन्मानित

359

The गडविश्व
ता.प्र/ धानोरा : स्थानिक जि. प. ज्यू. कॉलेज येथील इंग्रजी विषयाच्या प्रा. रश्मी शंकरराव डोके यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. “Postmodern Narrative Strategies In The Novels of Yann Martel” हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. सदर संशोधन कार्य प्राचार्य डॉ पी.अरूनाप्रकाश वाय.पोषेट्टीवर कॉलेज तळोधी यांच्या मुख्य मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले. त्यांच्या संशोधन कार्यात आतापर्यंत त्यांनीं ६ शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय शोधनिबंध पत्रिकेत प्रकाशित केले आहेत.
त्यांनीं आपल्या यशाचे श्रेय वडील शंकररावजी डोके , प्रमिला डोके, गुरुदासजी बनसोड, शेवंता बनसोड, ज्ञानेश बनसोड, प्रमोद डोके , उमेद डोके, आप्तेष्ट, व सर्व सहकारी व हितचिंतकांना दिले आहे. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here