फल ज्योतिष शास्त्र हे शास्त्र नाही तर ते फसवे विज्ञान आहे : ज्येष्ठ खगोलअभ्यासक शंकर शेलार

373

The गडविश्व
गडचिरोली, २१ सप्टेंबर : समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फल ज्योतिष शास्त्राच्या आधारे फसवणूक केली जाते ते फलजोती शास्त्र हे शास्त्र नाही त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही तर ते फसवे विज्ञान (सुडो सायन्स) आहे. ते खगोलशास्त्राचा आधार घेऊन सांगितले जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलअभ्यासक ,संचालक कॉस्मिक आय सांगली शंकर शेलार यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन संवाद अभियान अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन हा प्रबोधनपर कार्यक्रम आज २१ सप्टेंबरबरोजी विद्यापीठात घेण्यात आला. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, संचालक विद्यार्थी विकास डॉ.शैलेंद्र देव , संचालक शारीरिक शिक्षण विभाग डॉ. अनिता लोखंडे , विलास निंबोरकर अनिस राज्य सहकार्यवाह, वैज्ञानिक जाणीव प्रशिक्षण प्रकल्प कार्यवाह, नवल ठाकरे राज्य सहकार्य वाहक आदी उपस्थित होते.
खगोलशास्त्र हे प्रत्यक्षात कसे आहे काय आहे ? ग्रहतारे कसे आहेत ? ते कोणत्या नैसर्गिक नियमांनी बद्ध आहेत? याबद्दल सर्व शास्त्रीय माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे दिली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, तरुण पिढीने अंधश्रद्धेतून बाहेर पडून विज्ञानाची कास धरावी यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रद्धा, विश्वास ठेवायला हवा पण विज्ञानाचे कास धरून अंधश्रद्धेला दूर करायला हवे. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे त्यामुळे जग बदलण्याचे काम हे ते करू शकतात असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन रूपाली अलोणे तर आभार नंदा यादव यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here