The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महामंत्री पदी माडेतुकुम, गडचिरोली येथील रामचंद्र ढोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे यांनी केली आहे.
आज खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात रामचंद्र ढोंगे यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जि.प.चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी शहर अध्यक्ष सुधाकरराव यनगंधलवार, भाजपचे अनिलजी करपे, पत्रकार नरेंद्र माहेश्वरी उपस्थित होते.
रामचंद्र ढोंगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व त्यांचा अनुभव पाहता त्यांची भारतीय जनता पार्टीच्या संघटन वाढीसाठी मदत होईल या हेतूने त्यांची निवड किसान आघाडी च्या जिल्हा महामंत्री पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. किसान मोर्चा च्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन भाजपचे कार्य व केंद्राच्या योजनांचा प्रसार करून पक्षाचे संघटन वाढविणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.