महाराष्ट्रात उष्णतेची लाट : उष्माघाताने घेतला पहिला बळी

384

– बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत
The गडविश्व
जळगाव : महाराष्ट्रात उष्णतेची लाट धडकली आहे. अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची मोठी लाट आली आहे. जळगाव, धुळ्यात ४१ तर नंदुरबारचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत भिडला आहे.
या उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना राज्यातील जळगावा येथे काल सायंकाळी घटना घडली. जिल्ह्यातील अमळनेर मारवड गावातील जितेंद्र संजय माळी असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
जितेंद्र याने शेतात भर उन्हात दिवसभर काम केले. दिवसभर काम करत असतानाच त्याला सायंकाळच्या सुमारास शेतातच चक्कर आली. त्याचे चुलत भाऊ महेंद्र आणि मजुरांनी त्याला खासगी रुग्नालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. मात्र तेथून अमळनेरला नेत असताना तो पुन्हा बेशुद्ध पडला. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. जितेंद्र याला उष्माघातसदृश्य लक्षणे होती. त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉ. आशिष पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here