मुख्यमंत्री भगवंत मान यांचा तरुणांसाठी महत्वाचा निर्णय

710

The गडविश्व
चंदीगड : पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा तरुणांना होणार आहे. पंजाबमध्ये २५ हजार सरकारी नोकरीची भरती करण्यात येणार असल्याचे आजच्या मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापैकी पोलीस दलात १० हजार नोकऱ्या उपलब्ध करण्यात येणार आहे. भगवंत मान यांनी पंजाबमधील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्याच मंत्रिमंडळात भगवंत मान यांनी तरुणांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.
भगवंत मान सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज शनिवारी पंजाबमध्ये झाली. या बैठकीत राज्यातील २५ हजार रिक्त पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. विविध मंडळे, महामंडळे, शासकीय कार्यालयात ही पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळाने तीन महिन्यांसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा वार्षिक अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासोबतच मंत्रिमंडळाने पूरक अनुदानालाही मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here