– निरोगी राहण्यासाठी योग व प्राणायमाचा आधार घ्यावा
The गडविश्व
गडचिरोली : आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि त्याचे महत्व पोहचवण्यासाठी “आंतरराष्ट्रीय योग दिवस” २०१५ पासून सुरु करण्यात आला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून ला साजरा केला जातो. मॅजिक बस तर्फे बाम्हणी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी विषय शिक्षिका बारूबाई शेडमाके यांनी योगाबद्दल माहिती दिली. योगाचा आधार घेतल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य लाभते म्हणून नित्य नेमाने दररोज निदान सकाळी ३० मिनिट तरी योग प्राणायाम करावे असे सांगितले. जिवन कौशल्य शिक्षक देवाजी बावणे यांनी योग आणि प्राणायाम काळाची गरज आहे. माणूस हा वारा, अग्नि, जल, पृथ्वी व आकाश हा पंच तत्वाचा बनलेला आहे. या मानवाने स्वतःचा जीवन गुंतागुंतीचा बनविलेला आहे. त्यामुळे खूप साऱ्या रोगाला आमंत्रण देत आहे. या सगळ्या रोगापासून समस्यांपासून दूर जाण्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे योग आणि प्राणायाम. जीवनात योग व प्राणायमाला महत्व द्या असे मार्गदर्शनात सांगितले.