The गडविश्व
सावली : इयत्ता बारावीचा निकाल नुकताच लागला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील विद्यार्थिनी कु. मेहक दिवाकर शेंडे हिने मराठी या विषयात ९६ गुण प्राप्त करुन चंद्रपूर जिल्ह्यातून मराठी या विषयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. बारावीच्या परीक्षेत तिला ८०.१७ टक्के गुण मिळाले आहे. मेहेकच्या गुणवत्तेची दखल कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र ,जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानेश्वर हटवार यांनी घेतली असून मेहेकच्या उज्वल यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. मेहेकने आपल्या यशाचे श्रेय सावली तालुका अध्यक्ष प्रा. आर.व्ही. केदार आणि विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांना दिले आहे. प्रा. केदार सरांच्या उत्तम मार्गदर्शनात हे यश मला गाठता आले .अशी प्रतिक्रिया मेहेकने दिली आहे. तसेच विद्यालयातील कु.सुप्रिया अशोक कोसमशीले व केतन विस्तारी कोरेवार या विदयार्थ्यांनी मराठी विषयात ९५ गुण मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले असून त्यांनी प्रा. केदार सरांच्या उत्तम मार्गदर्शनात हे यश गाठता आल्याचे सांगितले.