The गडविश्व
गडचिरोली : शासनाने घातलेल्या कोविड- १९ साथरोग प्रतीबंधाच्या नियमानुसार यावर्षी होत असलेला महाशिवरात्री उत्सव सुद्धा दारू व तंबाखूमुक्त करण्यात येत आहे. कोविड समस्येचे मागील दोन वर्ष सोडता मागील ५ वर्षापासून महाशिवरात्री यात्रा दारू व तंबाखूमुक्त उत्सव मुक्तीपथ, मार्कंडा देवस्थान समिती व ग्राम पंचायत यांचे द्वारा यशस्वीरित्या साजरी करण्यात आली.
शासनाच्या नियमां चे पालन करीत दरवर्षी प्रमाणे, या संदर्भात देवस्थान समिती व ग्रामपंचायत प्रशासन द्वारा निणर्य घेत महाशिवरात्री उत्सव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी पहिल्या दिवसा पासून कृती केल्या जात आहे. भाविक महाशिवरात्री उत्सव निमित्त दर्शन करण्यासाठी येतात. काही व्यक्तींद्वारा दारू व तंबाखूच्या सेवनाने परिसरातील स्वच्छतेला व वातावरणाला गालबोट लागते, पावित्र्य भंग केल्या जाते. हे टाळून भक्तिपूर्ण वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा व्हावा, यात्रेच्या काळात कोणत्याही नशायुक्त पदार्थांचा वापर होऊ नये या हेतूने महाशिवरात्री उत्सव दारू व तंबाखुमुक करण्यात येते.
कुठलेही तंबाखूजन्यपदार्थ विक्री करू नये, साथरोग प्रतिबंध नियमानुसार खर्रा किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कुठेही थुंकू नये, नशायुक्त पदार्थांचा वापर करू नये, इत्यादी विविध कृती मुक्तीपथ कार्यकर्ता चमू, हरडे महाविद्यालय चामोर्शी चे राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी, मार्कंडा मुक्तीपथ गाव संघटना, ग्रा.पं. यांच्या संयुक्त प्रयत्नातून केल्या जात आहे. याचा व मागील ५ वर्षापासून करत असलेल्या दारू व तंबाखूमुक्त महोत्सव पद्धतीच्या परिणामामुळे, मार्कंडा परिसर या वर्षीच्या उत्सवात खर्रा विक्रीमुक्त आहे. खर्रा पन्न्याचे प्रमाण बोटावर मोजण्यासारखे आहे, हा चांगला परिणाम या कृतीतून यावर्षी सुद्धा दिसून येत आहे. याच पद्धतीने शासनाच्या नियमाचे पालन करीत यावर्षीचा महाशिवरात्री उत्सव दारू व तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, मुक्तीपथ, ग्रा.प. सरपंच व ग्रामसेवक यांनी केले आहे.