– जनहित ग्रामीण विकास संस्थेचा पुढाकार
The गडविश्व
चामोर्शी : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर तथा गण्यारपवार परिवार यांच्या सौजण्याने येनापुर येथे २३ एप्रिल रोजी पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.
सध्या जिल्ह्यात उष्णतेने कहर केला असून जिकडेतिकडे पाण्याची भटकंती सुरू आहे. अशातच येणापुर परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महीला, विविध कामाकरीता येनापुर येथे येत असतात. उष्णतेची लाट असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी जिकडे तिकडे फिरावे लागत होते मात्र येणापुर ठिकाणी कुठेच पाणपोई नाही, बँकेचे काम, वीज बिल भरणा केंद्र, ऑनलाईन सेवा केंद्र, खाजगी रुग्णालयात, इतर कामासाठी येणापुर येथे यावे लागत असल्याने गावात पाणपोई नसल्याकारणाने संस्थेने पाणपोई उभारण्याचा निर्णय घेतला. सदर पाणपोई डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ येणापुर येथे सुरु करण्यात आली.
सदर पाणपोईच्या शुभारंभ प्रसंगी उद्धघाटक म्हणून माजी जि. प. सदस्य तथा चामोर्शि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अतुल गण्यारपवार तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज.ग्रा. वि. बहु. संस्था येनापुरचे मार्गदर्शक मनमोहन बंडावार तसेच अशोक मंडल, सुरेश गुंतीवार, मोहन बंडावार, राहुल येडलावार, आकाश जक्कुलवार, स्वप्नील गोर्लावार, आकाश बंडावार, आयुष दुधे, संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र बंडावार, संस्थेचे सदस्य रवींद्र जक्कुलवार उपस्थित होते.