The गडविश्व
मास्को : रशियाने यूक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वादाची ठिणगी आरपार होणार आहे, याचे संकेत मिळाले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग अधिक दाटले आहेत.
डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतीन यांनी घोषणा केली आहे. यूक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आमचा यूक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने (UN) पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार घेतलेली नाही. युद्धाची घोषणा केली आहे.