The गडविश्व
ता.प्र / धानोरा , १४ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत सन २०२१- २२ मध्ये घेतलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रांगी येथील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवित शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रांगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थि इंशात लक्ष्मीकांत मेश्राम, लक्की डबांजी पेंदाम, अक्षरा संजय मडावी, लक्ष्मी दिलिप चांभारे हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहेत . तसेच शाळेचे मुख्याध्यापक वर्गशिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.