रेपनपल्ली येथे शिवजयंती उत्साहात साजरी

353

– पं. स. सभापती भास्कर तलांडे यांची उपस्थिती
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील रेपनपल्ली येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज रेपनपल्ली ग्राम पंचायत कार्यालयात पेसा प्रशिक्षण होते त्यांअनुषंगाने ग्राम पंचायत राजाराम खाँदला, तिमरम, दामरंचा, मडेरा आदि ग्राम पंचायत हद्दीतील सरपंच, उपसरपंच, कोष समितीचे अध्यक्ष यांचे प्रशिक्षण व शिवजयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती तथा विद्यमान पं.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, मेडराचे सरपंच विलास मडावी, तिमरमचे सरपंच सौ.सरोजना पेंदाम, उपसरपंच प्रफुल्ल नागूलवार, माजी सरपंच जिलकरशाह मडावी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ग्राम सेवक बाटवे यांनी केली तर प्रस्ताविक अहेरीचे पेसा समन्वयक संजय कोठारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.अनिता आलाम, रविता पेंदाम, शिपाई अमोल मडावी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here