The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १ नोव्हेंबर : येथील विश्रामगृहात जय विदर्भ पार्टी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष नासिर जुम्मन शेख यांच्या उपस्थितीत विदर्भ राज्य आंदोलन समिती वडसा तालुका बैठक पार पडली.
या बैठकीत खासदारांना राजीनामाचे पत्र पाठविणे, खासदारांच्या राजीनामे मागण्या करता त्यांच्या कार्यायालयावर जाऊन ११ नोव्हेंबर ला आंदोलन करणे, तसेच १९ डिसेंबर २०२२ ला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हल्लाबोल आंदोलनाच्या तयारी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुणभाऊ केदार, विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य अरविंद भोसले, गुलाबराव धांडे, वडसा तालुका महिला अध्यक्षा अर्शी शेख, वडसा तालुका युवा आघाडी अध्यक्ष अक्षय कुंदनवार, दिनेश पाजी, चंद्रशेखर बडवाईक, शामराव वाघाडे, दादाजी वाघाडे, शबाना शेख, सुफिया शेख, महेश नाग, किशोर धनोजे, दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते.