– गावाच्या वैभवात भर
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या विसापूर येथे शिवराय युवा मंडळ व गावकऱ्यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण काल १ मे महाराष्ट्रदिनी मोठ्या थाटात करण्यात आले. या पुतळ्यामुळे गावातील वैभवात भर पडली आहे.
अनावरण सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध आठ संघानी सहभाग घेत नृत्य सादर करीत उपस्थितांना रिजवीले. विशेष म्हणजे, राजमुद्रा प्रतिष्ठानने सादर केलेले लेझीम नृत्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन शिवसेनेचे शहर प्रमुख रामकिरीत यादव यांनी केले. दीप्रज्वलन माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, विधानसभा संघटक नंदू कुमरे, माजी नगरसेवक केशव निंबोड, रायुकाँ चे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, माजी नगरसेवक सतीश विधाते, संजय मेश्राम, रमेश चौधरी, विठ्ठल नवघरे , आशीष ब्राम्हणवाडे, पुमानंद पुन्नमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान, भगवे झेंडे, फुलांनी सजवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत व फटाक्यांच्या अतिशबाजीत मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
उपस्थित असलेल्या लोकांनी हा क्षण आपल्या डोळ्यात आणि मोबाइल कॅमेरात साठवून घेतला. सोबतच गावातील मुख्य चौकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण करण्यात आले. तसेच जयपूर येथे पार पडलेल्या मिनी गोल्फ स्पर्धेत ब्रांज मेडल पटकाविणाऱ्या गावातील प्रियंका इजगीरवार या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नागेश वाट यांनी केले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष सुरज बाबनवाडे, सचिव दूधराम म्हशाखेत्री, कोषाध्यक्ष विशाल उरकुडे, सहसचिव विकास भोयर, सदस्य शुभम कोटगले, हर्ष कोटगले, अनिकेत झरकर, कुमोद कोटगले, कुणाल जवादे, रुपेश मंटकवार, विनोद खेवले, स्वप्नील कोटगले यांच्यासह गावातील युवकांनी व नागरिकांनी सहकार्य केले.