शिक्षण क्षेत्रात खळबळ : टीईटी परीक्षेत ७ हजार ८०० अपात्र उमेदवार पैसे देऊन पास केल्याचे उघड

396

The गडविश्व
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत असतानाच आता नवीन खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी (टीचर्स एलिजीबिलीट टेस्ट) अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जात आहे. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आलेआहे. असे असतानाही या सर्वांना पात्र असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here