– तहसिलदार यांना भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निवेदनातून मागणी
THE गडविश्व
देसाईगंज : महामंडळाची धान खदेरी सुरू असल्याने शेतकऱ्यांना सन 2021-22 च्या सातबारा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता विविध दाखल्यांची अत्यंत आवश्यक आहे मात्र मागील काही दिवसांपासून तलाठी संपावर याचा फटका शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना सुध्दा बसत आहे. याची दखल भाजपा ओबीसी मोर्चा ने घेत देसाईंगंज येथील तहसिलदार यांना आज 6 जानेवारी रोजी निवेदन देवून शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून सातबारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच धान विक्री पासून शेतकरी वंचीत राहिल्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असे सुध्दा निवेदनातून तहसिलदार यांना कळविण्यात आले आले आहे.
निवेदन देतांना, भाजपा ओबीसी मार्चा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष सुनिल पारधी, ओबीसी मोर्चा महामंत्री चेतनदास विधाते, भाजपा महामंत्री योगेश नाकतोडे, भाजपा मीडीया सेल महामंत्री अध्यक्ष गौरव नागपूरकर, केवळराम झोडे, शामरावजी अलोणे, किसान आघाडी तालुका अध्यक्ष के.डी.झोडे उपस्थित होते.