The गडविश्व
ता.प्रतिनिधी / धानोरा : राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था नागपूर, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली व पोलीस मदत केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे आज २८ मार्च २०२२ रोजी भव्य शेतकरी बि-बियाणे वाटप कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. हुच्चे यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शास्त्रज्ञ डॉ. एन. एम. मेश्राम, राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन नागपूरच्या शास्त्रज्ञ डॉ. सौ. संगिता भट्टाचार्य मॅडम, प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली डॉ. संदीप कऱ्हाळे, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक ज्ञानेश्वर ताथोड, पोनि दामनवाड रा.रा.पो.बल गट क्र. ७ दौड तसेच पोमके परिसरातील प्रगत शेतकरी तुळशीराम कोरेटी, बाळवंतसिंग पडोटे मौजा कुलभट्टी, पुसवूराम काटिंगल सावरगाव, धनसिंग तुलावी बोधनखेडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी उपस्थित शेतकरी यांना कृषी विषयक माहिती व आधुनिक तंत्रज्ञान संबंधाने मार्गदर्शन करून पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती लागवड करणे, तसेच विविध फळांची फळबाग तयार करून दुप्पट नफा मिळविणेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी शासन शेतकरी वर्गाला गरजेनुसार सर्व प्रकारच्या बी-बियाणे पुरविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित प्रत्येकी शेतकऱ्यांना बी-बियाणे व साहित्य वाटप करण्यात आले यात निंबू झाड ल १५०, किट साहित्य १५०, मुंग बियाणे प्रत्येकी ५ किलो प्रमाणे १५०, भाजीपाला गरजे नुसार देण्यात आले. तसेच कार्यक्रमाला पोमके परिसरातील १५० ते २०० शेतकरी उपस्थित होते. उपस्थिताना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.